Landslide News : वैष्णो देवी मार्गावर दरड कोसळून मोठा अपघता झाला आहे. पायी मार्गावर हिमकोटीजवळ ही घटना घडली. या घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दरड कोसळताना दिसत आहे. या घटनेला रियासीच्या जिल्हा आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी कटरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.
जुन्या मार्गाने प्रवास सुरू
अपघातानंतरही भाविक जुन्या मार्गावरून प्रवास करत आहेत. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले, सोमवारी दुपारी 2:35 वाजता इमारतीच्या तीन किमी पुढे पंछीजवळ भूस्खलन झाले, या घटनेत जास्त प्रमाणात हानी झाली नसली तरी देखील भाविकांना काळजीचे आवाहन करण्यात आले आहे.
बचावकार्य सुरू
दरड कोसळल्यानंतर तातडीने येथे बचावकार्य सुरू करण्यात आले. सध्या जखमींच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
जम्मू-कश्मीर: श्री माता वैष्णो देवी भवन मार्ग पर पंची हेलीपैड के पास भूस्खलन हुआ। भूस्खलन में श्रद्धालुओं के फंसे होने की आशंका है। माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड लगातार राहत और बचाव कार्य कर रहा है। pic.twitter.com/u4j3GDiJxn
— IANS Hindi (@IANSKhabar) September 2, 2024
दरवर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
देशभरातून भाविक वर्षभर वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येतात. नवरात्रीनिमित्त येथे गर्दी वाढते. वर्षभर येथे येणाऱ्या भाविकांचा येथील अर्थकारणात मोठा वाटा असल्याचे मानले जाते. मात्र, पावसाळ्यात निसरड्या वाटेमुळे येथील चढण अवघड होते. अशा परिस्थितीत भाविक येथे येणे टाळतात.
यावर्षी 67 लाखांहून अधिक भाविकांनी केली यात्रा
यावर्षी 6707604 लोकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. तर 332,578 लोकांनी हेलिकॉप्टरने यात्रा केली आहे.