Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्य सरकाराच्या लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकराने या योजनेची घोषणा केली होती, या योजनेअंतर्गत महिलांना पहिला हप्ता मिळाला आहे. दरम्यान, आता या योजनेबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे.
सरकाराच्या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अजूनही वेळ आहे. मात्र, याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे.
या योजनेसाठी ज्या महिलांनी जुलै मध्ये फॉर्म भरला होता त्यांना जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. आणि ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे. पण ज्या महिलांनी ही तारीख चुकवली आणि 1 सप्टेंबर नंतर अर्ज भरला आहे त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना या 4500 रुपयांना मुकावे लागणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्यांना त्याच महिन्यापासून लाभ मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती, त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळले, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.