आम्ही महायुती म्हणून कायम सोबत आहोत आणि राज्याच्या जनतेचा प्रचंड मोठा जनाधार हा आम्हाला लाभला आहे.त्यामूळे हे असले उद्योग करायची गरज नाही आणि आम्ही ते कधी करतही नाही.त्यामूळे अशी विधाने जर कुणी करत असेल तर त्याला कितपत सिरियस घ्यावं हा प्रश्नच आहे.स्पष्टच सांगायचे झाले तर आम्ही उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना अजिबात सिरियस घेत नाही,अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे.
स्थानिकांचा विरोध असताना देखील उदय सामंत यांना 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश दिला गेला. सामंत यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मेहनत घेतली होती, असे राजन साळवी म्हणाले आहेत.
२०१४ आणि २०१९ मध्ये उदय सामंत यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिले होते. २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उदय सामंत यांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री केले .एवढे भरभरून देऊन सुद्धा सामंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठित खंजीर खुपसून शिंदे गटात गेले.आता २०२४ मध्ये सामंत हे शिंदेची साथ सोडून भाजप मध्ये प्रवेश करत कमळ चिन्हावर निवडणूक लढतील,असे भाकीत आमदार साळवी यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्याचे दिसून आले
दरम्यान, सामंत हे मुख्यमंत्री शिंदे यांचे खास विश्वासू आणि निष्ठावान मानले जातात.सध्या त्यांच्याकडे राज्याच्या उद्योग मंत्री पदाचा कारभार आहे.सामंत हे खरंच शिंदेंची साथ सोडतील का? किंवा ते खरंच भाजपवासी होतील का? अशी चर्चा आता कोंकणात आणि राज्यात रंगली आहे.