Rahul Gandhi : राज्यातील आगामी विधानसभा निवणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक बडे नेते महाराष्ट्र दौरा करत आहेत तर काही नेते दिल्लीला चकरा मारत आहेत, दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र्र दौऱ्यावर आहेत.
आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण महर्षी महाराष्ट्राचे माजी मंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि ‘लोकतीर्थ’ स्मारकाचे अनावरण करण्यासाठी राहुल गांधी सांगली जिल्ह्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच राहुल गांधी गुरुवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ देखील करणार आहेत. महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार असल्याचे संकेत आहेत. या निवडणूका काँग्रेस UBT सेना आणि NCP-SP सोबत युती करून लढवणार आहेत.
राहुल गांधींसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, त्यांच्या आगमनानंतर राहुल गांधी दुपारी 1 वाजता वांगी येथे माजी राज्यमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील आणि त्यानंतर दुपारी 1.45 वाजता कडेगावमध्ये जाहीर सभा घेतील.
काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवर यासंबंधित माहिती देताना लिहिले, “काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.”
असा असेल कार्यक्रम
राहुल गांधी सांगलीला जाण्यापूर्वी नांदेड येथे जाऊन दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. नांदेडहून थेट ते कोल्हापूरला जाणार आहेत कोल्हापूरमधून ते सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
कैलासवासी पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती आहे. कडेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांची जाहीर सभाही देखील होणार आहे. अशा स्थितीत आगामी निवणुका पाहता राहुल गांधी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.