Eknath Shinde : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक सातत्याने सरकारवर जोरदार टीका करत आहेत. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या शिल्पकाराला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी संतप्त लोकांकडून केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. मात्र, त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जयदीप आपटे याला शोधण्यासाठी पोलिसांच्या सात तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. अनेक प्रयत्नानंतर अखेर जयदीप आपटेला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्री म्हणाले, “जयदीप आपटेची कसून चौकशी होईल आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई देखील होईल. पळून पळून पळणार कुठे? असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
याचसोबत पुढे बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना दिल्लीतील गल्ली गल्लीमध्ये जावून मला मुख्यमंत्री करा अस म्हणावे लागत आहे याच बाळासाहेबांना दुख होत असेल कारण ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असा टोला एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावलेला आहे.
पुढे ते म्हणाले, “बाळसाहेबांचे विचार सोडले की अशी गत होते यामुळेच आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने पुढे चाललो असून बाळसाहेबांचा विचारच आम्ही पुढे घेऊन जात आहे.” असे शिंदेनी यावेळी म्हंटले आहे.