राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना एक थेट आव्हान दिले आहे. टीव्ही 9 मराठीच्या ‘काँक्लेव्ह’मध्ये बोलताना भुजबळ यांनी जरांगे यांना विधानसभा निवडणुकीत त्यांच्या समोर उमेदवारी लढवण्याचे आव्हान दिले आहे भुजबळांच्या या आव्हानांवर जरांगे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भुजबळ यांनी स्पष्ट केले की, जरांगे यांची भूमिकाही फक्त समाजसुधारणा किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांपुरतीच मर्यादित असावी. भुजबळ यांनी जरंगेंना आमच्या मतदारसंघात उभं राहून निवडणूक लढवावी, असे सांगितले. भुजबळ म्हणाले, “जरांगे हे केवळ एक विशिष्ट मुद्द्यावर भाषण करून जनतेला गुमराह करत आहेत. वास्तविक त्यांना निवडणुकीच्या मैदानावर उभं राहून आपली ताकद सिद्ध करावी लागेल.”
मनोज जरांगे यांच्याकडून भुजबळांवर वारंवार टीका केली जात आहे. जरांगे यांनी सांगितले होते की, भुजबळांनी मराठा समाजासाठी काहीच ठोस योगदान दिलेले नाही. त्यामुळे आता भुजबळांच्या या आव्हानाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याचबरोबर भुजबळांनी आपल्या भूमिकेतून राजकीय वर्तमनातील इतर मुद्द्यांवरही टिप्पणी केली. त्यांनी सरकारवर टीका करत, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या कमतरतेविषयी चिंता व्यक्त केली. त्यांच्या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची गती आणि दिशा निश्चित करण्यासाठी एक नवा धागा जोडला गेल्याचे सांगितले जात आहे.