Kolkata : तृणमूल काँग्रेसचे (TMC) राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी रविवारी कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून मी माझे पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
ममता बॅनर्जींना लिहिले पत्र
जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आरजी कर हॉस्पिटलमधील त्या घटनेबाबत सरकार तातडीने काही कठोर कारवाई करेल अशी अशा आहे. जुन्या ममता बॅनर्जींप्रमाणे त्या लवकरात लवकर कारवाई करतील. गेल्या काही दिवसांत त्यांनी तातडीने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. कारवाई करण्यास देखील उशीर झाला. राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
पत्रात ते म्हणाले, ‘आरजी कर हॉस्पिटलमध्ये झालेल्या भीषण घटनेनंतर मला त्रास होत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हंटले.’
जवाहर सरकार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोलकात्यातील सध्याची निदर्शने, ज्याने बंगालला हादरवून सोडले आहे, हे टीएमसी सरकारच्या ‘काही लोकांच्या अनियंत्रित दबंग वृत्ती आणि भ्रष्ट लोकांच्या’ विरोधात जनतेच्या संतापाचे प्रतिबिंब आहे.”
ते पुढे म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेवा, जनतेचा हा रोष काही खास भ्रष्ट लोकांच्या अनियंत्रित दबंग वृत्तीविरोधात आहे. मी माझ्या संपूर्ण कार्यकाळात सरकार विरोधात एवढा अविश्वास कधीच पाहिला नाही, आरजी कर मेडिकल कॉलेजच्या घटनेवर मी महिनाभर गप्प बसलो होतो आणि तुम्ही जुन्या ममता बॅनर्जींच्या शैलीत कारवाई कराल आणि आंदोलक ज्युनियर डॉक्टरांशी थेट बोलाल, अशी आशा होती, पण तसे झाले नाही. प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारने याबाबत कडकपणा दाखवला. भ्रष्ट डॉक्टरांचे संगनमत तोडून अन्यायकारक कारवाई करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई केली असती तर बंगालमध्ये फार पूर्वीच परिस्थिती पूर्वपदावर आली असती. असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले.
"While thanking you sincerely for giving me such a great opportunity to represent the problems of West Bengal as an MP in the Rajya Sabha, I must inform you that I have decided to resign from parliament and also from politics altogether…," writes Jawhar Sircar (@jawharsircar)… pic.twitter.com/MPFT48Hdpg
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2024
त्यांनी असेही लिहिले की, ‘आंदोलनाचा मुख्य प्रवाह अराजकीय आहे असे माझे मत आहे आणि त्याला राजकीय म्हणत संघर्ष निर्माण करणे योग्य नाही. अर्थात, बिकट परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करण्याचा विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे, पण रोज रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींच्या गटाला प्रोत्साहन मिळत नाही. त्यांना राजकारण नको, न्याय हवा. हे आंदोलन जितके महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी आहे तितकेच राज्य सरकारचे आहे.
त्यासाठी सरकारने तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा जातीयवादी शक्ती या राज्याचा ताबा घेतील. वैयक्तिक बोलण्याची संधी न मिळाल्याने हे सर्व लिहावे लागले. तुम्ही मला बंगालचे प्रश्न खासदार म्हणून मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो, पण आता मला खासदार म्हणून अजिबात राहायचे नाही.