अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सध्या त्यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवास्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये UAE आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अबुधाबीचे क्राउन प्रिन्स रविवारी दिल्लीत पोहोचले. अबुधाबीच्या क्राऊन प्रिन्सची ही पहिलीच भारत भेट आहे. त्यांच्यासोबत यूएईचे अनेक मंत्रीही भारतात पोहोचले आहेत.
यासोबतच अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद यांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. तसेच यावेळी ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहेत. अबू धाबीच्या क्राउन प्रिन्सची भारत भेट अशा वेळी होत आहे जेव्हा इस्रायल-हमास युद्धामुळे दोन्ही देशातील परिस्थिती तणावपूर्ण आहे.
मुंबईतील बिझनेस फोरममध्ये सहभागी
अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद यांनी आज मुंबईला भेट देत बिझनेस फोरममध्ये सहभागी झाले. ज्यात दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगपती उपस्थित होते. यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, भारत आणि यूएईचे ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अलिकडच्या वर्षांत, भारत आणि UAE मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी राजकारण, व्यापार, गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृती यासह अनेक क्षेत्रांमध्ये अधिक दृढ झाली आहे. तसेच क्राउन प्रिन्सच्या भेटीमुळे भारत-यूएई द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील आणि नवीन उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भागीदारीचे मार्ग खुले होतील. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.