Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सर्वेसर्वा शरद यांची जडण – घडण ही शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराच्या घरात झाली त्यामुळे ते कट्टर नास्तिक म्हणून ओळखले जातात. आजवर ते सार्वजनिक रीत्या कधीच कुठल्या देवळात दर्शनाला किंवा पूजेला गेले नाहीत. पण काही वर्षात बदलेला राजकारणाचा पासपोस पाहता नेत्यांना धार्मिक ठिकाणी भेटी द्यायची तीव्र गरज दिसतेय.
अशातच काल शरद पवार यांनी मुंबईत लालबाग राजाचं दर्शन घेतलं. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी गणरायच दर्शन घेणं ही फक्त मतांसाठी सुरु असलेली धडपड असल्याचे दिसून येते. आजवर शरद पवारांनी फक्त तीन वेळा गणरायच दर्शन घेतलं आहे. २००५ मध्ये ते कालनिर्णय संस्थापक जयंत साळगावकर यांच्या गणेश प्रतिष्ठापनेला गेले होते. त्यानंतर दोन वर्षापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. आणि काल त्यांनी सार्वजनिक रीतीने लाल बाग राजाचे दर्शन घेतले. अशा स्थितीत शरद पवारांची नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे वाटचाल ही फक्त आगामी विधानसभा निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कालच्या त्यांच्या दर्शनानंतर विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत, आगामी विधासभा निवडणुकीमध्ये शरद पवार मतं वळवण्यासाठी ढोंगीपणा करत असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे, शरद पवारांची अचानक नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे वाटचाल ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्टंट असल्याचे म्हंटले जात आहे.