राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची ( Vidhansabha Election ) तयारी जोरदार चालू आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेत्यांनी पक्षांतर देखील केलेले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे ( Samarjit Ghatge )यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar ) गटात प्रवेश केला आहे. अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) आणि शरद पवार गटाचे समरजीत घाटगे हे दोघे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून विरुद्ध उभे राहणार आहेत अशी चर्चा चालू आहे. यावरूनच आता हसन मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांच्या पक्षांतरावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात हसन मुश्रीफ बोलत होते. बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम होता. शरद पवार साहेबांना सांगून पक्ष सोडला आणि पवार साहेबांनी मला परवानगी दिली म्हणूनच मी अजित पवार यांच्यासोबत असल्याचा मोठा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. परंतु काही लोक खूप विश्वासघाती असतात.देवेंद्र फडणवीस यांचा अशाच काही लोकांनी विश्वासघात केला आहे असे अप्रत्यक्ष आरोप हसन मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांच्यावर बोलताना केलेले आहेत.
तसेच कागलमध्ये मीच निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत कागलच्या जनतेने मला सहा वेळा निवडून दिले आहे. यावेळी देखील लोक मला निवडून देतील आणि कागलचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचे काम मी करणार आहे असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलेले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी खैर नाही…” असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले होते. यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत कोण विजय मिळवणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.