कॉँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारांनी उत्तर महाराष्ट्राला सडवले होते. , आम्ही त्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढत विकासाला चालना दिली तसेच धुळे जिल्ह्याला हरित क्रांतीकडे नेत दुष्काळी हा शिक्का महायुतीने पुसून काढला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी आज धुळ्यात केले आहे.
जिल्ह्यातील जामफळ धरणाच्या लाभक्षेत्र बंदिस्त नाला वितरण प्रणालीच्या उद्घाटणाला ते आज धुळ्यात आले होते,त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या आणि राज्यात महायुती काळात उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला कशी चालना दिली गेली त्याची माहिती लोकांना दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, देशात मोदी आणि महाराष्ट्रात महायुती सत्तेत आल्यामुळे धुळे जिल्हा आता दुष्काळी जिल्हा नव्हे तर सुकाळी जिल्हा म्हणून ओळखला जाईल.कॉँग्रेस – राष्ट्रवादीच्या राज्यातल्या १४ वर्षाच्या सत्ताकाळात उत्तर महाराष्ट्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सुलवाडे बॅरेजसाठी त्यांनी फक्त २६ कोटी रुपये दिले होते. ती अगदीच तुटपुंजी रक्कम होती.आम्ही सत्तेत आल्यावर त्या रकमेत १०० टक्के वाढ करून तो प्रकल्प पूर्ण केला. शेतकरी विकासासाठी असणारी बळीराजा कृषि संजीवनी योजना ही देशात फक्त महाराष्ट्राला मिळाली.
त्याच योजनेचा फायदा राज्यात सगळयात जास्त फायदा उत्तर महाराष्ट्राला मिळाला.माजी खासदार सुभाष भामरे आणि आमदार जयकुमार रावल हे उत्तर महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ आहेत. त्यांचाच सातत्याने पाठपुरावा सुरू असल्यामुळे नद्यातून वाहून जाणारे ९.२४ टीएमसी पाणी हे शिंदखेडा आणि धुळे तालुक्याला तालुक्याला मिळेल.आता आमच्या सरकारने शेतकरी वीज बिल देखील माफ केलय.तसेच सौर कृषि वाहिनी योजना आणून येत्या दोन वर्षात राज्यभर हरित उर्जीकरण करण्याचा आमचा मानस आहे.यंदाच्या अर्थ संकल्पात देखील आम्ही धुळे – नंदुरबार जिल्ह्यांसाठी अनेक योजनांची बरसात केली आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या इंडस्ट्री हबमध्ये धुळे – नंदुरबार जिल्हे देखील समाविष्ट होतील असेही ते पुढे म्हणाले आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन, सुभाष भामरे, जयकुमार रावल, शिरपूर पॅटर्नचे अमरिषभाई पटेल, मंजुळा गावीत,काशीराम पावरा,राजवर्धन कादंबमबांडे , धरती देवरे – पाटील आदी नेते उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावलेली दिसून आली.