वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला सोडले असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. 2014 ते 2019 दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार असलेले चिकटगावकर यांनी 2019 मध्ये वैजापूर विधानसभेची जागा आपल्या पुतण्याला दिली होती. शिवसेना फुटल्यानंतर चिकटगावकर यांनी दोन वर्षांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता, आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
चिकटगावकर यांना उमेदवारी देण्याएवजी नवा उमेदवार दिला जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.
दोन वर्षांपूर्वी चिकटगावकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून ठाकरे गटात प्रवेश केला होता. मुंबईतील मातोश्री बंगल्यावर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पण ठोंबरे काका-पुतण्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे चिकटगावकर अस्वस्थ झाले होते. त्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली होती. मात्र, आता ते महाविकास आघाडीत वैजापूरची जागा सोडल्याने शिंदे गटात जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दरम्यान, चिकटगावकर हे आता कोणत्या पक्षात प्रवेश करतील हे लवकरच स्पष्ट होणार आहे. सध्याच्या स्थितीत, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.