दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. त्यामुळे दिल्लीतील भाजप आमदारांनी केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात दिल्लीतील भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्याची आता राष्ट्रपती सचिवालयाने दखल घेतली आहे.
घटनात्मक संकटाचा हवाला देत भाजप आमदारांनी दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तसचं केजरीवाल तुरुंगात असल्याचाही या पत्रात उल्लेख आहे. राष्ट्रपती कार्यालयाने हे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवले आहे. अशा स्थितीत राजधानी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप आमदारांचे हे निवेदन राष्ट्रपती सचिवालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवल्यानंतर या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे.
Delhi Assembly LoP Vijender Gupta's letter to President Droupadi Murmu, signed by 7 other MLAs and one former MLA, making an "urgent appeal for Presidential intervention to address grave constitutional crisis and dismissal of the AAP Government in Delhi" has been forwarded to…
— ANI (@ANI) September 10, 2024
घटनातज्ञांच्या मते राज्यातील जनतेचा सरकारवर आता विश्वास राहिला नाही. अशी राष्ट्रपतींची किंवा राज्यपालांची खात्री पटल्यावर कोणत्याही क्षणी त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येते. सध्या दिल्लीत मुख्यमंत्री जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्या सरकारविषयी लोकांच्या मनात आता अजिबात आस्था नाही अशी जर राष्ट्रपतींची खात्री पटली तर दिल्लीत नक्कीच राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते.
दिल्ली हे विधानसभा क्षेत्र असलेला केंद्र शासित प्रदेश आहे. दिल्ली विधान सभेत एकूण ७० आमदारांचा समावेश आहे.