सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर हल्लाबोल केला असल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या यांच्या नावाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) आयोग संपर्क प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली होती परंतु याची कल्पना किरीट सोमय्या यांना दिली नव्हती यावरूनच आता न विचारता असे नाव घोषित करणे ही पद्धत अतिशय चुकीची असून मला हे मान्य नाही असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलेले आहे.
हे पद मला नको आहे असे सांगणारे पत्र किरीट सोमय्या यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेले आहे. या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले आहेत की, “मी साडे पाच वर्ष झाली भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. यापुढेही मला सामान्य सदस्य म्हणूनच काम करून द्या. तसेच प्रचार समितीचा सदस्य पदी नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो परंतु या समितीत काम करण्यास मी असमर्थता व्यक्त करतो असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
तसेच आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकणार नसून सामान्य सदस्य बनूनच आयुष्यभर पक्षाचे काम करत राहणार आहे. असे किरीट सोमय्या यांनी पत्रामार्फत सांगितलेले आहे. किरीट सोमय्या यांच्या या पत्रामुळे ते स्वतच्या पक्षावर नाराज आहेत का अशी चर्चा रंगली जात आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती परंतु आता त्यांनी ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिलेला आहे.
दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये किरीट सोमय्या खासदार झाले होते.