Rahul Gandhi : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य आणि बायडेन (Joe Biden) प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. राहुल यांची ही बैठक वॉशिंग्टन डीसीमध्ये झाली. यावेळी इल्हान उमरही (Ilhan Omar) येहे उपस्थित होती. राहुल गांधी यांचे तिच्यासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या इल्हान सोबतच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
खरं तर इल्हान उमर अमेरिकेचा वादग्रस्त चेहरा आहे. मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर त्यांनी टीका केली आहे. तसेच कलम 370 च्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली होती. तसेच त्यांनी भारतविरोधी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. असे असतानाच राहुल गांधी यांच्या सोबतची त्यांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून राजकीय वर्तुळातून राहुल गांधींवर सडकून टीका केली जात आहेत, तसेच भाजप देखील हल्लाबोल चढवत आहे.
Rahul Gandhi is DESPERATE..period
Only someone that desperate will meet radical Islamist Ilhan Omar pic.twitter.com/48lkSygpGD
— Sanju Verma (@Sanju_Verma_) September 10, 2024
कोण आहे इल्हान उमर?
इल्हानचा जन्म सोमालियात झाला. सोमालियामध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान, त्याच्या कुटुंबाने सोमालिया सोडले आणि केनियातील निर्वासित छावणीत आश्रय घेतला. त्यावेळी इल्हान आठ वर्षांचा होती. त्याच्या कुटुंबाने केनियातील निर्वासित छावणीत जवळपास चार वर्षे घालवली. त्यांचे कुटुंब 1990 मध्ये येथून अमेरिकेत आले. त्यानंतर इल्हानने अमेरिकेत राजकारणात आपली कारकीर्द घडवली.
2016 मध्ये, इल्हान उमरने निवडणूक जिंकली आणि मिनेसोटा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पोहोचली. 2019 मध्ये इल्हान मिनेसोटामधून खासदार म्हणून निवडून आली. इल्हान उमर ही अमेरिकन काँग्रेसची सदस्य होणारी पहिले आफ्रिकन महिला आहे. यासोबतच मिनेसोटाचे प्रतिनिधित्व करणारी इल्हान उमर ही पहिली कृष्णवर्णीय महिला आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये पोहोचणाऱ्या दोन मुस्लिम-अमेरिकन महिलांपैकी इल्हान उमर देखील एक आहे.
भारतविरोधी वक्तव्य
अमेरिकन डेमोक्रॅट खासदार इल्हान उमर ही नेहमीच भारतविरोधी बोलताना दिसली आहे. इल्हान 2022 मध्ये पाकिस्तानला भेट देण्यासाठी आली होती. या काळात ती पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्येही गेली होती. भारताने तिच्या दौऱ्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करत निषेध केला. यानंतर बायडेन प्रशासनाला या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले. दौरा अमेरिकन सरकारने प्रायोजित केला नसल्याचे सरकारने म्हटले होते. त्यावेळी पाकिस्तानात सत्तेसाठी संघर्ष सुरू होता. अमेरिका आपले सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप इम्रान करत होते. त्यानंतर इल्हान उमर पाकिस्तानात गेली होती. एकीकडे इम्रान पाकिस्तानी जनतेला सांगत होते. ‘अमेरिका त्यांच्या विरोधात कट रचत आहे, तर दुसरीकडे इल्हान उमर पाकिस्तानात जाऊन इम्रान खान यांची भेट घेतला दिसल्या.