Raigad : रायगड (Raigad) जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील ( MIDC ) केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याची बातमी आहे. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
कंपनीत झालेल्या स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली, या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की एक किलोमीटर परिसरात याचा आवाज आला. यानंतर घटनास्थळी परिसरातील पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आणि येथे बचाव कार्य सुरु केले.
तीन कामगारांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, काही कर्मचारी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहीती उघड झाली आहे. आता या ठिकाणी बचाव कार्य सुरु असून, येथून कामगारांना बाहेर काढले जात आहे. ही घटना कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर याचा तपास केला जाईल.
दरम्यान, गेल्यावर्षी देखील रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी येथे ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या घटनेत तब्बल सात कामगार ठार झाले होते. आज झालेल्या घटनेनंतर या स्फोटाच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी झालेला स्फोट इतका भयंकर होता की स्फोटाने महाड एमआयडीसी हादरली होती. या घटनेत त्यावेळी ५७ कर्मचारी या कंपनीत अडकले होते.