सध्या देशभरात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अनेक पक्षांच्या जागावाटपावरून बैठक देखील पार पडल्या आहेत. सध्या हरियाणा, जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यामुळेच भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची देखील तयारी सुरू झाली आहे.
हरियाणामध्ये 5 ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पाडले जाणार आहे. हरियाणामध्ये ९० जागांसाठी एकाच टप्यात ही निवडणूक होणार असून या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर करण्यात येणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. यामुळे आता या निवडणुकीची सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नावे हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांमध्ये आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एमएल खट्टर, अर्जुन राम मेघवाल, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, रवनीत सिंग बिट्टू, राव इंद्रजित सिंग आणि कृष्ण पाल गुर्जर यांचाही या यादीत समावेश आहे. तसेच इतर स्टार प्रचारकांमध्ये पक्षाच्या विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. भाजप पक्षाचे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राजस्थानचे भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे पुष्कर सिंग धामी आणि आसामचे हिमंता बिस्वा सरमा यांचा समावेश देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहे.
दरम्यान, पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, सुधा यादव, वसुंधरा राजे सिंधिया, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, दिया कुमारी, हेमा मालिनी, किरण चौधरी, नवीन जिंदाल, कुलदीप बिश्नोई आणि बबिता फोगट यांचा देखील स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.