Rahul Gandhi : रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राहुल गांधींना देशातील एक नंबरचे दहशतवादी म्हंटले आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी शिख समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शिख समुदाय कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही तरीही या समाजात ठिणगी टाकण्याचं काम राहुल गांधींनी केलं आहे. राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी आहेत असं बिट्टू यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत शिख समुदायाबाबत जे वक्तव्य केलं त्यानंतर बिट्टू यांनी हे म्हटलं आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “राहुल गांधी परदेशात गेल्यावर नेहमीच देशाबद्दल वाईट बोलतात. त्यांना व्यावहारिक समज नाही. आजपर्यंत त्यांना मजूर-मोचीच्या (समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश ) वेदना कळल्या नाहीत. वयाच्या निम्म्याहून अधिक वेळ निघून गेली तरी त्यांना त्यांची चेष्टा होते हे देखील समजत नाही.
राहुल गांधींच्या अमेरिकेतील शिखांच्या वक्तव्याबाबत बिट्टू म्हणाले, “अलीकडे त्यांनी आपल्या वक्तव्याने शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे फुटीरतावादी शक्तींनी कौतुक केले आहे. रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, आजच्या युगात राहुल गांधी हे देशाचे नंबर एकचे दहशतवादी आहेत, ते देशाचे शत्रू आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
पुढे म्हणाले, “आधी राहुल गांधींनी मुस्लिमांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही आणि आता ते शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.”
अमेरिका दौऱ्यावर शीख समुदायाबाबत टिप्पणी
वॉशिंग्टन डीसीच्या व्हर्जिनिया उपनगरात 9 सप्टेंबर, 2024 रोजी शेकडो भारतीय अमेरिकन लोकांच्या मेळाव्याला संबोधित करताना गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांपेक्षा कनिष्ठ समजत असल्याचा आरोप केला. आणि म्हणाले की, भारतातील लढा या विषयावर होता आणि राजकारणासाठी नाही. “सर्वप्रथम, लढा कशासाठी आहे हे समजून घेतले पाहिजे. लढा राजकारणाचा नाही. ते वरवरचे आहे,”
पुढे ते म्हणाले, “शीखांना भारतात पगडी घालण्याची परवानगी द्यायची की नाही याविषयी हा लढा आहे. किंवा तो, एक शीख म्हणून, गुरुद्वाराला जाऊ शकणार आहे. भांडण तेच आहे. आणि फक्त त्याच्यासाठीच नाही तर सर्व धर्मांसाठी.” असे वक्तव्य त्यांनी अमेरिकेत केले होते.