Ganesh utsav 2024 : गणरायाला आता निरोप देण्याची वेळ जवळ आली असून, सर्वच मंडळांनी मिरवणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात सध्या मिरवणुकीची जय्यत तयारी सुरु असून, मनाच्या पाच गणपतीच्या मिरवणुकांचीही तयारी सुरु झाली आहे. आज सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार आहेत. तर पुण्यातील लाडक्या बाप्पाचे म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू होणार असल्याची माहिती आहे.
जरवर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
पोलिस प्रशासन, वैद्यकीय सुविधा, सुसज्ज
आज शहरभरात विर्सजन मिरवणूक पार पडणार असून, मोठ्या पोलिस प्रशासन, वैद्यकीय सुविधा, ठिकठकाणी तैनात करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे शहर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दरवर्षीच्या प्रथेनुसार महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पहिले पाच गणपती आणि त्यानंतर इतर गणेश मंडळे लक्ष्मी रोडसह केळकर, कुमठेकर, टिळक आणि कर्वे रस्ता अशा मिरवणूक मार्गांवरून विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होतील.
साडेसहा हजार पोलिसांचा ताफा
पुण्यातील मिरवणुकीसाठी साडेसहा हजार पोलिसांचा मोठा फोडफाटा तैनात करण्यात आला आहे. तर महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी मार्शलची पथके असणार आहेत.