Ganesh Chaturthi 2024 : आज संपूर्ण महाराष्ट्रात गणपती (Ganpati ) विसर्जन करण्यात येणार आहे. “निरोप घेता देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी” अशा शब्दांत गणेशभक्त आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अनेक शहरांतील गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच नाशिक (Nashik) शहरातील गणेश विसर्जनासाठी देखील प्रशासन सज्ज झाले आहे. अनेक ठिकाणी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकांसह, विविध धार्मिक कार्यक्रमांमधून जगजागृतीही करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेकडून गणेश विसर्जनासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिकेकडून सहा विभागांत नैसर्गिक घाट व कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे. तसेच विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 कृत्रिम तलावांचे नियोजन देखील करण्यात आले असून पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन नाशिक महापालिकेने केले आहे.
गणेश विसर्जनासाठी नाशिक पोलिसांकडून 3 हजार पोलिस, दंगा नियंत्रण पथक सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 200 सीसीटीव्ही कॅमेरे सहा ड्रोन कॅमेरे देखील निवडणूक मार्गावर लावण्यात आले आहेत. यासोबत पोलीस आयुक्तांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.