Delhi CM Oath Ceremony : आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्या आतिशी मार्लेना (Atishi Marlena) लवकरच दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आतिशी या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शिला दिक्षित (Sheila Dikshit), भाजप पक्षाच्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी अतिशी शनिवार 21 सप्टेंबर रोजी शपथ घेतील.
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. केजरीवाल यांच्या या निर्णयाला आमदारांनी देखील सहमती दर्शवली.
असा असेल शपथविधी सोहळा
सहा महिन्याच्या उर्वरित कार्यकाळासाठी आतिशी आता दिल्ली सरकारचे नेतृत्व करणार आहेत. आतिशी यांचा शपथविधी राजभवन येथे होणार असल्याची माहिती आहे. एलजी सचिवालयातील सूत्रानुसार, व्ही.के. सक्सेना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रातमध्ये, दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांच्या शपथविधीची तारीख २१ सप्टेंबर ही प्रस्तावित केली आहे. तसेच त्यांनी वर्तमान मुख्यमंत्री केजरीवाल यांचा राजीनामाही राष्ट्रपती मुर्मू यांना पाठवला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
वृत्तानुसार, कालकाजी मतदारसंघातील आप आमदार आतिशी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करतील. दरम्यान, ‘आप’ सरकारने 26-27 सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. तुमच्या माहितीसाठी पुढील वर्षी 23 फेब्रुवारीला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. तर फेब्रुवारीच्या सुरुवातीला निवडणुकाही होण्याची शक्यता आहे.
Atishi will take oath as the Chief Minister of Delhi on September 21. Along with Atishi, other leaders will also take oath as ministers: Aam Aadmi Party
(file photo) pic.twitter.com/bILGqL2fHO
— ANI (@ANI) September 19, 2024
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १३ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. तुरूंगातून बाहेर येताच केजरीवाल यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी ते म्हणाले, ‘जनतेच्या कोर्टात स्वतःला निर्दोष सिद्ध केल्यानंतरच या खुर्चीवर बसेल जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही…मी प्रत्येक घरात आणि रस्त्यावर जाऊन जनतेची भेट घेणार असून जनतेचा निकाल येईपर्यंत मुख्यमंत्र्यांची खुर्चीत बसणार नाही, असं त्यांनी म्हंटल आहे.