Devendra Fadnavis : राज्य सरकाराच्या लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकराने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेवरून विरोधक सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आमच्या विरोधकांनी लाडक्या बहीण योजनेचा मोठा धसका घेतला आहे. कारण त्या योजणेमुळे राज्यातल्या सगळ्या बहीणींचे आशीर्वाद आम्हा तिन्ही भावांना मिळत आहेत. त्यामुळे ते येण – केण प्रकारे या योजनेला बंद करण्याचा मार्गावर आहेत. पण मी तुम्हाला ग्वाही देतो की, काहीही झालं तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. आज ते बुलढाण्यात बोलत होते.
फडणवीस आज बुलढाण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मदत मिळत आहे, या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात आला असून, दुसरा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांना अजूनही फॉर्म भरता येणार आहे. महिला या योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.