Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज दिल्लीत छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यातील पीडितांची भेट घेतली. यावेळी अमित शहांनी नक्षलवाद्यांवर मोठे वक्तव्य करत नक्षलवादी हिंसाचार आणि नक्षलवादी विचारसरणी नष्ट करण्याविषयी बोलले आहे.
यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ठरवले आहे की देशातून नक्षलवादी हिंसाचार आणि नक्षलवादी विचारसरणी नष्ट केली जाईल. पुढे अमित शहांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडून शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्याचे आवाहनही केले. हिंसाचार सोडण्याचे माझे आवाहन नक्षलवाद्यांनी मान्य केले नाही तर लवकरच त्यांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच या देशातून नक्षलवाद आणि नक्षलवादाची कल्पना मुळापासून नष्ट करून टाकू. असेही त्यांनी म्हंटले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हंटले आहे की, ‘नरेंद्र मोदी सरकार बस्तरमधील 4 जिल्हे वगळता संपूर्ण देशात नक्षलवादाचा नायनाट करण्यात यशस्वी ठरले आहे. या देशातील नक्षलवादाला शेवटचा निरोप देण्यासाठी 31 मार्च 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्याआधीच नक्षलवाद नष्ट केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पुढे ते म्हणाले, ‘मी नक्षलवाद्यांना कायद्यासमोर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करतो. आपले शस्त्र टाका. ईशान्येकडील आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोकांनी शस्त्रे सोडली आणि मुख्य प्रवाहात सामील झाले. मुख्य प्रवाहात येण्यासाठी तुमचेही स्वागत आहे, पण तसे झाले नाही तर आम्ही त्याविरोधात मोहीम सुरू करू आणि त्यात यशस्वीही होऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
#WATCH | Union Home Minister Amit Shah says, "We will end Naxalism. I appeal to (Naxalites) to surrender before the law, give up their weapons. In many places in the North-East and Kashmir, many people have given up their weapons and joined the mainstream. You are also welcome to… https://t.co/fvlyVxH52u pic.twitter.com/yaAOAKhXPC
— ANI (@ANI) September 20, 2024
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील नक्षलवादी हिंसाचारामुळे पीडित लोकांच्या एका गटाने गुरुवारी जंतरमंतरवर निदर्शने केली आणि त्यांच्या भागात न्याय आणि शांतता असावी या मागणीसाठी आंदोलन केले. ‘बस्तर शांती समिती’च्या बॅनरखाली या गटाने कर्तव्य मार्गावरून आपला निषेध सुरू केला आणि दुपारपर्यंत जंतरमंतर गाठले. बस्तर शांतता समितीचे समन्वयक मंगुराम कवाडे म्हणाले, “आम्ही अनेक दशकांपासून नक्षलवादी हिंसाचार सहन करत आहोत. आमची गावे उद्ध्वस्त झाली आहेत आणि आमचा प्रदेश विकासापासून वंचित राहिला आहे, “आम्ही मागणी करतो की बस्तरचा आवाज ऐकला जावा आणि आमच्या लोकांना या सततच्या हिंसाचारातून मुक्त केले जावे,”