Devendra Fadnavis : राज्य सरकाराच्या लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकराने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहिना दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेअंतर्गत महिलांना पहिला हप्ता मिळाला असून, आता दुसरा हप्ता लवकरच मिळणार आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी यासाठी अर्ज केला आहे, दरम्यान ज्या महिलांनी अजूनही अर्ज भरला नसेल त्या महिला सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. अशातच ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे त्यांना कधीपर्यंत पैसे मिळणार आहेत? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
🕖 संध्या. ७.०४ वा. | २१-९-२०२४📍नागपूर.
LIVE | बांधकाम कामगार मेळावा#Maharashtra #Nagpur #Construction https://t.co/BcZTUOH3b3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 21, 2024
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पैसे याच महिन्याच्या (सप्टेंबर) अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. नागपूरमध्ये आयोजित बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
या योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही या योजनेंतर्गत वर्षाला 11 हजार म्हणजेच दर महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करत आहोत. तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही. महिलांना त्यांचा हक्क दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पुढे त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हंटले, “काँग्रेस कोर्टामध्ये गेलं आहे. मात्र ही योजना कधीही बंद होणार नसून सुरूच राहणार आहे. आम्ही कोर्टात सांगितलं आहे की या योजनेसाठी आम्ही बजेटमध्ये पैसा ठेवला आहे. आम्ही कोणतीही योजना हवेत आणलेली नाही. काँग्रेसने कितीही विरोध केला तरी ही योजना बंद होणार नाही असा शब्द फडणवीस यांनी यावेळी दिला.