उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून जंगम (जंगम मालमत्ता म्हणजे गुरेढोरे किंवा वैयक्तिक वस्तू ) आणि स्थावर( स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन किंवा इमारती ) मालमत्तेचा तपशील न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणाऱ्या डीडीओचा ( विथड्रॉल डिस्ट्रीब्युशन ऑफिसरकचा ) पगारही थांबवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह (Manoj Kumar Singh) यांनी सर्व विभागांना याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.
आतापर्यंत 90 टक्के कर्मचाऱ्यांनी जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती दिलेली आहे. 12 सप्टेंबरपर्यंत यूपीतील एकूण 844374 कर्मचाऱ्यांपैकी 719807 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या चल आणि अचल संपत्तीची माहितीचा तपशील दिला आहे. परंतु अजूनही अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती दिलेली नाही. राहिलेले सर्व कर्मचारी ३० सप्टेंबरपर्यंत मानव संपदा पोर्टलवर मालमत्ता घोषित करू शकतात असे मुख्य सचिवांनी जारी केलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे.
पोर्टलवर सर्व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची माहिती उपलब्ध असल्याची खात्री करण्याची जबाबदारी डीडीओ(विथड्रॉल डिस्ट्रीब्युशन ऑफिसर) यांची असणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिलेला नाही, त्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार दिला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. राहिलेल्या कर्मचाऱ्यांनी जर याबाबतचा तपशील दिला नाही तर यासाठी डीडीओ यांना जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांचा देखील पगार थांबवण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचा तपशील पोर्टलवर नोंदवण्याची जबाबदारी सर्व विभाग प्रमुखांची आहे, कोणाचा तपशील दिसत नसल्यास संबंधित नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून समस्या दूर कराव्यात,अश्या सूचना देखील मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी दिलेल्या आहेत.