Jammu And Kashmir Elections 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट शेअर करत जम्मू काश्मीर मधील लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले आहे. बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदी यांनी सर्व मतदारांना “लोकशाही बळकट करण्यासाठी” मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
“जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाचा दुसरा टप्पा आहे. मी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो तसेच त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी,” असे देखील पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे.
विधानसभेच्या 26 जागांसाठी होणार मतदान
काश्मीर विभागातील गंदरबल, श्रीनगर आणि बडगाम आणि जम्मू विभागातील रियासी, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांतील 26 विधानसभा मतदारसंघातील सर्व 3502 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.
तुमच्या माहितीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत जे मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत, त्यांचेही पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आहे.
पीएम मोदींनी सोशल मीडिया हँडल X वर म्हंटले, “या प्रसंगी मी सर्व तरुण मित्रांचे अभिनंदन करतो जे पहिल्यांदाच मतदान करत आहेत!!!”
केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील ट्विट करत मतदानाचे आवाहन केले आहे, ‘या निवडणुकीत लोकसहभाग जम्मू आणि काश्मीरच्या “सुवर्ण भविष्याचा” मार्ग मोठा करेल. असे म्हंटले आहे
त्यांनी यावेळी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे देखील आवाहन केले आहे. पुढे त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर हल्लाबोल करत “प्रत्येक मतामुळे या प्रदेशातून भ्रष्टाचार आणि घराणेशाही दूर होईल.” असे देखील म्हंटले आहे.
26 जिल्ह्यांतील 26 जागांवर 25 लाखांहून अधिक मतदार
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान बुधवारी सकाळी सुरू झाले. केंद्रशासित प्रदेशातील सहा जिल्ह्यांतील 26 जागांवर 25 लाखांहून अधिक मतदार आहेत.