Nashik : महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, शिवसेना गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘बदलापूर घटनेतील आरोपीने दिलेल्या जाबजबात अनेक खुलासे केले होते म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. या प्रकरणात कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.’
पुढे, ‘एका शिंदेचा एन्काउंटर झाला असला तरी दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, या शब्दांत टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ग्रामीण भागातील कार्यक्रमासाठी खासदार राऊत नाशिकमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देत आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटरचे प्रकरण शंका घ्यावे, असे आहे. पुढे त्यांनी, हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. या प्रकरणात मोठे मासे वाचविण्यासाठी हा एन्काउंटर घडवण्याचा आरोप केला.
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण केले आहे त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा एन्काउंटर केला गेला का? असा सवाल देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केला. फास्ट ट्रॅकवर खटला चालविला जाणार असताना व त्याला फाशी देणार असल्याचे सांगितले असताना तातडीने एन्काउंटर करण्याची गरज का पडली याचे उत्तर सरकारकडून अपेक्षित आहे. असे देखील यावेळी त्यांनी म्हंटले आहे.