उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकार नंतर आता हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) काँग्रेस सरकारनेही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हिमाचल सरकारने आज बुधवारी नवीन धोरण तयार केले आहे. नवीन धोरणानुसार, आता हिमाचल प्रदेशातील रस्त्यावरील खाद्य विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिकांना त्यांची ओळख दाखवावी लागणार आहे. योगी सरकारने हा निर्णय कवाड यात्रेदरम्यान घेतला होता. मात्र, या प्रकरणाची न्यायालयात अजूनही सुनावणी सुरु आहे, अशातच आता हिमाचल सरकराने देखील हा निर्णय घेतला आहे.
अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने ओळखपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. नवीन धोरणानुसार आता खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना दुकाना बाहेर, तसेच गाड्यांवर नावाची पाटी लावावी लागणार आहे. नवीन नियमांनुसार प्रत्येक प्रकारच्या विक्रेत्यांना त्यांचे नाव आणि फोटो दाखवावा लागणार आहे.
#WATCH | Shimla: Himachal Pradesh Minister Vikramaditya Singh, "We did a meeting with the UD (Urban Development) and the Municipal Corporation. To make sure that hygienic food is sold, a decision has been taken for all the street vendors…especially those selling edible items…… pic.twitter.com/7wi5bhapr8
— ANI (@ANI) September 25, 2024
हिमाचल प्रदेशचे नगरविकास मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राज्यात नवीन धोरण बनवण्याबाबत सांगितले की, “आम्ही नगरविकास विभाग आणि महानगरपालिकेसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत रस्त्यावरील सर्व विक्रेत्ये स्वच्छ खाद्यपदार्थ विकतील याची काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’
“सर्वसामान्य जनतेने या संदर्भात त्यांच्या चिंता आणि शंका व्यक्त केल्या होत्या आणि हे लक्षात घेऊन आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे असे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये विक्रेत्यांना त्यांचे नाव आणि ओळखपत्र दाखवणे बंधनकारक केले जाईल. आता प्रत्येक दुकानदाराला आणि रस्त्यावरील विक्रेत्याला त्याचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.