जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Elections 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले आहे. 26 जागांवर हे मतदान झाले आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. अनेक दिग्गज नेते ही निवडणूक लढवत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे गंदरबल आणि बडगाम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जम्मू काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून दुपारी 3 वाजेपर्यंत 46.12 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या मतदानात रियासी जिल्हा 63.91% ने आघाडीवर आहे.
याचसोबत या मतदानात पूंछ जिल्हात 61.45% मतदान झाले आहे. राजौरी जिल्यात 58.95%, बडगाम जिल्यात 49.44%, गंदरबल जिल्यात 61,45% आणि श्रीनगर येथे 22.62% टक्के मतदान करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील या मतदानासाठी, 25,78,099 लाख मतदार मतदानासाठी पात्र होते, त्यामध्ये 13,12,730 लाख पुरुष मतदार, 12,65,316 लाख महिला मतदार आणि 53 तृतीय-लिंग मतदारांचा समावेश आहे. आज झालेल्या मतदानाच्या यादीत रियासी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान 51.55% इतके नोंदवले गेले असून श्रीनगरमध्ये सर्वात कमी मतदान म्हणजेच 17.95% इतके नोंदवले गेले आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि या निवडणुकीची मतमोजणी 8 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.