Kirit Somaiya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अब्रुनुकसानीच्या (Defamation) खटल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून, कोर्टाने त्यांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी विधानसभेच्या आधी तुरुंगात टाकायचा डाव असल्याचा आरोप केला.
संजय राऊत यांच्या याच आरोपावर आता किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत हिम्मत असेल तर हायकोर्टात जाऊन सांगा असे म्हंटले आहे. सोमय्या म्हणाले, ‘संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हायकोर्टात जावे आणि तेथे हेच सांगावे की निवडणुकीच्या आधी मला तुरुंगात टाकण्याचा डाव आहे.’
सोमय्या पुढे म्हणाले, ‘हे फक्त इथे बोलत आहेत यातील एकही शब्द त्यांच्या अपिलमध्ये नसेल. आरती कुलकर्णी यांच्या न्यायालयाने संजय राऊतला दोषी ठरवले आहे. संजय राऊत आरती कुलकर्णी यांच्यावर संशय व्यक्त करत आहे. हा न्यायालयाचा अपमान आहे. त्यांच्यात खरंच हिम्मत असेल तर त्यांनी हायकोर्टात जावे’, असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे.
#WATCH | Mumbai: On conviction of Shiv Sena UBT leader Sanjay Raut, BJP leader Kirit Somaiya says, "Sanjay Raut has been sentenced to 15-day imprisonment, he has been taken into custody. Rs 25,000 fine has been imposed on him. He will have to pay this sum to complainant Prof. Dr.… https://t.co/f8HXnGDwOe pic.twitter.com/LBCEgOhMgI
— ANI (@ANI) September 26, 2024
कोणत्या प्रकरणात संजय राऊतांना शिक्षा झाली?
मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यांनी माध्यमांसमोर आपली बदनामी केल्याचा आरोप मेधा सोमय्या यांनी आपल्या याचिकेत केला होता. याच प्रकरणी आज सुनावणी पार पडली आणि संजय राऊत दोषी आढळले. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने राऊत यांना 15 दिवसांचा कारवास तसेच 25 हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.