Haryana Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते प्रचारासाठी मोठमोठ्या रॅली काढत आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुरुग्रामच्या बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच वक्फ बोर्ड कायद्याबाबतही मोठे वक्तव्य केले.
या प्रचार सभेत अमित शहा म्हणाले की, ‘वक्फ बोर्डाच्या या कायद्यात अनेक समस्या आहेत, आम्ही हिवाळी अधिवेशनात या कायद्यात सुधारणा करून ते सरळ करण्याचे काम करू.’
पुढे काँग्रेसवर निशाणा साधत अमित शाह म्हणाले, ‘इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी… काँग्रेसच्या तीन पिढ्यांनी लष्कराचा आदर केला नाही. त्यांच्या काळात वन रँक-वन पेन्शनची मागणी पूर्ण झाली नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन रँक-वन पेन्शनची मागणी पूर्ण केली. पीएम मोदींनी वन रँक-वन पेन्शनची तिसरी आवृत्तीही लागू केली. आता नव्या पगारासह पेन्शनही मिळणार आहे.
काँग्रेस नेते राहुल बाबा अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात, पण भाजप ओबीसी आणि एसी आरक्षण संपू देणार नाही. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, भाजपच्या राजवटीत हरियाणात खूप काम झाले आहे. या सभेत त्यांनी हरियाणातल्या कामाची यादी देखील वाचून दाखवली.
पुढे ते म्हणाले, ‘काँग्रेसचे राहुलबाबा हे खोटे बोलण्याची मशीन आहेत. सरकार पेन्शनसह नोकऱ्या देऊ इच्छित नसल्याने अग्निवीर योजना आणल्याचे त्यांचम्हणणे आहे. पण तसे नाही. ही योजना आणण्यामागे आपल्या सैन्याला तरुण मिळवेत यासाठी अग्निवीर योजना तयार करण्यात आली आहे. तसेच पुढे त्यांनी अग्निविरांना पेन्शनसह नोकरी देण्याचे देखील आश्वासन दिले.