Cabinet Meeting Decision : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकराने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. तसेच यासंदर्भातला शासन आदेश अर्थात जीआर जारी करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशात यासंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
आपण सगळेच जाणतो, ‘देशी गायीचे दुध मानवी आहारात किती महत्वाचे आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत दूध फायदेशीर मानले जाते. देशी गायींच्या दुधात मानवी शरीराला आवश्यक असणारे सगळे पोषक तत्व आढळतात, अशा स्थितीत देशी गायीच्या दुधाल पूर्णअन्न देखील म्हंटले जाते.
देशी गायींच्या दुधाचे मानवी आहाराती स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वाप तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. त्यामुळे देशी गायींचे पालनपोषण करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे’, असं शासनाच्या आदेशात म्हंटले आहे.
राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ). मात्र, दिवसेंदिवस देशी गायीच्या संख्येत होणारी घट चिंतेची बाब असल्याचे आदेशात स्पष्ट म्हंटले आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत ही योजना ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल. महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत ही योजना ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल. माहितीनुसार, 2019 मधील 20 व्या पशुगणनेनुसार, देशी गायींची संख्या 46,13,632 इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. तर 19व्या जनगणनेच्या तुलनेत ही संख्या 20.69 टक्क्यांनी कमी झाली आहे.