बॉलीवूड अभिनेता गोविंदा(Govinda) याच्या पायाला गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात (CritiCare Asia Multispeciality Hospital) उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी ४.४५ वाजता घडली आहे. अभिनेता गोविंदा आज सकाळी कुठेतरी निघाला होता यावेळी त्याच्याकडे स्वतची रिव्हॉल्व्हर होती. गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची माहिती मिळालेली आहे. अभिनेता इतक्या सकाळी लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन कुठे जात होता? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबतच आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
या घटनेनंतर अभिनेता गोविंदाची बंदूक जप्त करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. अभिनेता गोविंदा सकाळी कोलकाताला जाण्याच्या तयारीत होता यादरम्यान ही घटना घडली आहे. कोलकत्त्याला जाण्याआधी गोविंदा आपलं रिव्हॉल्व्हर त्यांच्या बॅगमध्ये ठेवत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर सुटलं आणि त्यातून निघालेली गोळी थेट त्यांच्या पायाला लागली अशी माहिती गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी दिलेली आहे.
सध्या अभिनेता गोविंदा यांची प्रकृती स्थिरावली आहे परंतु त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा माहिती दिली गेली नाही .या घटनेनंतर अभिनेता गोविंदाचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी अभिनेता गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केला होता. अभिनेता गोविंदा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. आता या घटनेमुळे अभिनेता गोविंदा पुनः एकदा चर्चेत आला आहे.