Uddhav Thackeray : उद्धटपंत, कोण होता तुम्ही, काय झाला तुम्ही? तोंडाची सतत टकळी, उघडलं की गटारगंगा वाहते, ‘फेक नॅरेटिव्ह’ बादशहा, वैतागलेली जनता पाहते..काका-नाना पुढं माथा टेकला, चिखलफेकीत माखला,भगवा फेकला, गटाला हिरवा रंग देऊन टाकला ! अशा शब्दात चारोळी करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक्स पोस्ट करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे हे कायम वेगवेगळ्या प्रसंगी टोमणे मारत भाजप नेत्यांना टार्गेट करत असतात.त्यांना त्यांच्याच स्टाईलने भाजपच्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.
उद्धटपंत,
कोण होता तुम्ही, काय झाला तुम्ही?
तोंडाची सतत टकळी, उघडलं की गटारगंगा वाहते,
'फेक नॅरेटिव्ह' बादशहा, वैतागलेली जनता पाहते..
काका-नाना पुढं माथा टेकला, चिखलफेकीत माखला,
भगवा फेकला, गटाला हिरवा रंग देऊन टाकला !@uddhavthackeray @Shivsenaofc #महाभकास_बिघाडी pic.twitter.com/HSl1FPq8Fg— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 1, 2024
तुम्ही अब्दली आहात अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल की उद्धव ठाकरे साहेबांना मी एवढच सांगेल की तुम्ही तुमचा चेहरा एकदा आरश्यात बघून घ्या, कारण आमच्या ज्या शीर्षस्थ नेत्यांनी काश्मीर मधून कलम ३७० हटवल त्यांना तुम्ही काहीही म्हणून स्वतची चव घालून घेत आहात.
दरम्यान, यावर आता जोरदार टोलेबाजी रंगताना दिसते, उद्धव ठाकरे हे स्वतच सेल्फ गोलचे शिकार झाले आहेत असंही या प्रकरणात दिसतय.