PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (गुरुवारी) देशवासियांना नवरात्रीच्या (Navratri 2024) शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी आपल्या X अकाउंटवर पोस्ट शेअर करत देवीची उपासना करण्यासाठी समर्पित हा पवित्र सण सर्वांसाठी शुभ सिद्ध व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
यावर्षी नवरात्र 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. नवरात्रोत्सव देशभरात श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या या नऊ दिवसात सर्वत्र प्रसन्न वातावरण असते, तसेच भक्त देवीच्या सेवेत मग्न दिसतात.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर मोदींनी पोस्ट शेअर करत देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, ‘सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा. शक्तीची उपासना करण्यासाठी समर्पित हा पवित्र सण सर्वांसाठी शुभ ठरो अशी आमची इच्छा आहे.’ शैलपुत्री देवीच्या पूजेने नवरात्रीची सुरुवात होत असल्याचे सांगत ते म्हणाले, ‘नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्रीला समर्पित प्रार्थना!!! शैलपुत्री देवीच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो. यासोबतच पंतप्रधानांनी माता शैलपुत्रीला समर्पित गाण्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.
समस्त देशवासियों को नवरात्रि की असीम शुभकामनाएं। शक्ति-वंदना को समर्पित यह पावन पर्व हर किसी के लिए शुभकारी सिद्ध हो, यही कामना है। जय माता दी!
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2024
पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा का केली जाते?
शारदीय नवरात्रीचा पवित्र सण आज 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाला असून नवरात्रीची सांगता दशमी तिथीला शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या पवित्र उत्सवात नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यातील पहिला दिवस हा शैलपुत्री देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे रूप असलेल्या शैलपुत्री देवीचा जन्म हा हिमालयाच्या पर्वतराजवळ झाल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले.
धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, पर्वत राजा हिमालयाने आपल्या मुलीचे म्हणजेच माता शैलपुत्रीचे पृथ्वीवर स्वागत केले. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते.