आज भारतीय शेअर बाजारात (Stock Market ) मोठी घसरण पाहायला मिळाली. इस्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे जगातील वातावरण तापले असून, त्याचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटमवर दिसून आला. या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे भारतीय शेअर मार्केटही आज चिन्हावर व्यवहार करताना दिसले. तसेच सेबीचे (SEBI) नवे नियम देखील याला कारणीभूत ठरत आहे. आज (गुरुवारी) सकाळी शेअर बाजार उघडताच सर्वत्र एकच गोंधळ उडाला. सकाळपासूनच शेअरमार्केट चाल चिन्हावर सुरु झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 1264 अंकांनी घसरून 83,002.09 वर उघडला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात 266 अंकांच्या घसरणीसह 25,530 वर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टीच्या 50 शेअर्स पैकी 44 शेअर लाल चिन्हावर दिसले तर फक्त 6 शेअर हिरव्या चिन्हावर व्यवहार करताना दिसले. त्याच वेळी, सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी कट 3 शेअर हिरव्या चिन्हावर व्यवहार करताना दिसले.
सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला तर निफ्टीही…
जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतशी बाजारातील घसरण वाढत गेली. दुपारपर्यंत सेन्सेक्स 1817 अंकांच्या घसरणीसह 82,449 वर व्यवहार करताना दिसला. त्याच वेळी, NSE निफ्टी 543 अंकांच्या घसरणीसह 25,253 वर व्यवहार करताना दिसला.
जपानच्या शेअर बाजारातही वादळ
भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची चिन्हे आधीच दिसू लागली होती. तर आज जपानमध्ये देखील शेअर बाजार कोसळताना दिसला. जर आपण जागतिक शेअर बाजाराबद्दल बोललो तर आज जपानच्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जपानी शेअर बाजारात घसरणीचे कारण म्हणजे तेथे सुरु असलेल्या राजकीय घडामोडी. नुकतीच जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅट्सनी माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा यांची पुढील पंतप्रधान (जपान न्यू पीएम) म्हणून निवड करण्यात आली, ते सध्याचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची जागा घेणार आहेत. फुमियो हे लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.