National Investigation Agency : एनआयएने दहशतवादी फंडिंग (National Investigation Agency) संदर्भात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. NIA ने जवळपास 22 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) आणि महाराष्ट्रासह (Maharashtra) 5 राज्यांमध्ये टाकण्यात आले आहेत.
एनआयएच्या या कारवाईत आतापर्यंत 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर छत्रपती संभाजी नगर येथून 1 आणि मालेगाव येथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या चार संशयितांची सध्या चौकशी सुरू असून हे चौघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.
बारामुल्ला येथेही छापेमारी
एनआयएने जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथेही छापे टाकले आहेत. दहशतवादी घटनांचा तपास करण्यासाठी हा छापा टाकण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रासोबतच दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये देखील एनआयएचे छापेचे सुरू आहेत. यापूर्वीही NIA ने 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील छापे टाकले होते.
ऐन विधानसभेच्या तोंडावर एनआयएची मोठी कामगिरी
पुढील महिन्यात (नोव्हेंबर) महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका लागणार आहेत. अशा परिस्थितीत एनआयएने केलेली ही कारवाई सर्वात मोठी मानली जात. एकीकडे निवडणूक तर दुसरीकडे देशविरोधी कारवायांसाठी निधीचा मुद्दा समोर येत आहे.
सध्या चारही संशयितांची चौकशी सुरु असून सर्व प्रकारची माहिती गोळा केली जात आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्येही छापे टाकण्यात आले आहेत. तुमच्या माहितीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. तर निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत.