Israel Attacks French Company : इस्रायल (Israel) हमास, हिजबुल्ला आणि इराणसोबत एकाच एक वेळी लढत आहे. अशातच आता इस्रायलने फ्रान्सला मोठा धक्का दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) आणि फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्यातील शब्दयुद्धाच्या दरम्यान, इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील फ्रेंच आंतरराष्ट्रीय कंपनीवर हवाई हल्ला केला आहे.
वृत्तानुसार, इस्रायलने बेरूतच्या दक्षिणेकडील भागात टोटल एनर्जी या फ्रेंच कंपनीवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर परिसरात मोठी आग लागली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. तसेच कोणतीही जीवित हानी झालेली नाही. लेबनॉनच्या मुद्द्यावर फ्रेंच सरकार नेहमीच दुटप्पी धोरण अवलंबत असल्याचा आरोप इस्रायलने यावेळी केला आहे.
नेतन्याहू-मॅक्रॉन वाद ?
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी वाद सुरू आहे. नेतन्याहू यांनी, सर्व सभ्य देशांना इस्रायलसोबत संपूर्ण शक्तीने उभे राहणायचे आवाहन केले होते. इराणच्या नेतृत्वाखालील राक्षसी शक्तींसोबत आम्ही लढत आहोत. याच वेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलवर शस्त्रास्त्रबंदी लादण्याचे आवान “लजास्पद” असल्याचेही म्हटले आहे.
इस्रायलवर शस्त्रास्त्र बंदीसाठी मॅक्रॉनच्या आवाहनाने नेतान्याहूंना धक्का बसला होता. फ्रान्सच्या या आवाहनावर नेतान्याहू संतप्त झाले आणि त्यांनी या निर्णयाचा आणि मॅक्रॉनचा तीव्र निषेध केला. तसेच नेतान्याहू यांनी या निर्णयाला लजास्पद असल्याचे म्हंटले आहे.
मात्र, नेतन्याहू यांच्या वक्तव्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने निवेदन सादर करून स्पष्टीकरण दिले. फ्रान्स इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावा यात करण्यात आला होता. इराणने इस्रायलवर हल्ला केल्यास फ्रान्स इस्रायलच्या पाठीशी उभा राहील, असे फ्रान्सने स्पष्ट केले होते. असे असतानाही इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील फ्रेंच कंपनीला लक्ष्य केले आहे.
नुकतेच नेतन्याहू यांनी, ‘पाश्चात्य देश सोबत असो वा नसो या युद्धात इस्रायलच जिंकेल. आम्ही जिंकल्याशिवाय थांबणार नाही, इस्रायल कोणत्याही देशाच्या पाठिंब्याने किंवा त्यांच्या पाठिंब्याशिवाय जिंकेल. असे म्हंटले आहे. अशा स्थितीत आता फ्रान्स काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.