Ram Nath Kovind : एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेवर स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation one Election) हे संविधान आणि संघराज्याच्या विरोधात नसल्याचे म्हंटले आहे. एकाचवेळी निवडणुका घेण्याची कल्पना संविधान निर्मात्यांची होती, त्यामुळे ती असंवैधानिक असू शकत नाही, असे ते म्हणाले आहेत.
रामनाथ कोविंद म्हणाले की, एक देश, एक निवडणूक लागू करण्यासाठी अंमलबजावणी समिती विविध घटनादुरुस्तींवर विचार करेल. त्यानंतर या प्रस्तावावर अंतिम निर्णय संसद घेईल. दिल्लीत लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात माजी राष्ट्रपतींनी याबद्दल माहिती दिली.
एक राष्ट्र, एक निवडणूक यावर बोलताना ते म्हणाले, ‘1967 पर्यंत पहिल्या चार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होत होत्या. मग एकाचवेळी निवडणुका घेणे घटनाबाह्य कसे म्हणता येईल? काही विभागांचे म्हणणे आहे की ,एकाचवेळी निवडणुका घेण्याची कल्पना असंवैधानिक आहे, परंतु हे खरे नाही कारण राज्यघटनेच्या रचनाकारांचीही तीच कल्पना होती.’
#WATCH | Delhi: Former President Ram Nath Kovind says, "Simultaneous elections were the norm in the early years of the republic. Elections to the Lok Sabha and state assemblies were synchronized during the first four electoral cycles…This cycle of concurrent elections was… pic.twitter.com/lISBbCdNV2
— ANI (@ANI) October 6, 2024
‘निवडणूक आयोगासह अनेक संस्थांनी यापूर्वीही या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. एकाचवेळी निवडणुका घेतल्याने संघवाद आणखी मजबूत होईल. कारण तिन्ही स्तरांची सरकारे मिळून पाच वर्षे काम करतील. सततच्या निवडणुकांमुळे आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 1.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. पुढे ते म्हणाले, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा लोकप्रिय वाक्प्रचार आहे, ज्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ लावला आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था – नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना आहे, जेणेकरून तिन्ही स्तरांचे शासन एकाच वेळी निवडले जातील आणि पाच वर्षे एकत्र काम करतील.
ते म्हणाले की, ’47 राजकीय पक्षांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीला निवेदन दिले आहे. यापैकी ३२ जणांनी एकाचवेळी निवडणुका घेण्यास पाठिंबा दिला आहे. याव्यतिरिक्त, 15 पक्ष एकाचवेळी निवडणुका घेण्यास विरोध करत आहेत.’