Mohamed Muizzu : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) सध्या भारत दौऱ्यावर असून, नुकतेच ते नवी दिल्लीत पोहोचले आहेत. मुइज्जू हे पाच दिवस भारत दौऱ्यावर आहेत. मुइज्जू यांच्यासोबत त्यांच्या पत्नी साजिदा मोहम्मदही त्यांच्यासोबत आहेत. काही वेळापूर्वी ते दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत. आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती मुइज्जू पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील.
मालदीवमध्ये सत्तेवर येताच मुइज्जू यांनी भारताविरुद्ध अनेक टिप्पण्या केल्या होत्या. त्यानंतर भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. मात्र, चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू यांच्यावर आर्थिक संकट ओढावल्याने ते शांत झाल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही मालदीव सरकराकडे पैसे नव्हते. अशास्थितीत बँक ऑफ मालदीवकडून 800 दशलक्ष (80 कोटी) रुपयांचे कर्ज घेतले होते.
देश आर्थिक संकटातून जात असताना मोहम्मद मुइज्जू यांच्या भारत दौऱ्यावर सर्वांची नजर आहे. ते मोदींच्या भेटीसाठी भारतात आले आहेत. मुइझू मुइज्जू 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत असणार आहेत. यापूर्वी मुइज्जू भारतात जूनमध्ये पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते.
#WATCH | Maldives President Mohamed Muizzu and First Lady of Maldives, Sajidha Mohamed arrive at Delhi airport.
During this visit, President Muizzu will hold meetings with President Murmu, Prime Minister Narendra Modi and other senior officials. pic.twitter.com/ei5CtjrD5s
— ANI (@ANI) October 6, 2024
मुइज्जूचा यांचा संपूर्ण कार्यक्रम
मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती मुइज्जू यांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट असणार आहे. आपल्या भारत भेटीदरम्यान मुइज्जू मोदी आणि द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारत आणि मालदीव यांच्या परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. यानंतर ते मुंबई आणि बेंगळुरूलाही जाणार आहेत, जिथे ते व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.