Jammu Kashmir Elections Results : आज सकाळपासूनच जम्मू काश्मीर विधानसभा (Haryana and J&K Election Results 2024) निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरुवातीला नॅशनल कॉन्फरन्स (NC) आघाडीला 90 जागांवर बहुमत मिळताना दिसले.
काश्मीरच्या श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या इल्तिजा मुफ्ती या सुरुवातीपासूनच मागे आहेत. मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर NC उमेदवार बशीर अहमद शाह 3877 मतांनी आघाडीवर आहेत.
बिजबेहरा ही जागा गेल्या 25 वर्षांपासून मुफ्ती कुटुंबाचा आणि त्यांचा पक्ष पीडीपीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. येथून विजयी झाल्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद आणि त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनले आहेत. यावेळी बिजबेहारा जागा जिंकण्याची जबाबदारी इल्तिजा मुफ्ती (मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी) यांच्याकडे देण्यात आली आहे.
येथून तीन उमेदवार रिंगणात आहेत. नॅशनल कॉन्फरन्सने बशीर अहमद तर भाजपचे सोफी युसूफ हे इल्तिजा मुफ्ती विरुद्ध लढत आहे.
मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर इल्तिजा मुफ्ती यांना 9,096 मते मिळाली आहेत, तर बशीर अहमद शाह यांना 12,973 मते मिळाली आहेत. भाजपच्या सोफी युसूफ यांना 1,244 मते मिळाली आहेत. तर बिजबेहरा मतदारसंघातील 654 मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला आहे. बिजबेहरा जागेवर मतमोजणीच्या एकूण 15 फेऱ्या होणार आहेत.
दरम्यान, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तीन टप्प्यात एकूण 63.88 टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीर विधानसभेत महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी 69.88 टक्के होती, तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांहून अधिक होती.