▪️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष आपण साजरे करीत आहोत.
▪️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारताच्या मातृशक्तीच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या दैदीप्यमान परंपरेच्या उज्ज्वल प्रतीक आहेत.
▪️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखिल भारतीय दूरदृष्टीने आपल्या राज्याच्या सीमेबाहेरही तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांचे पुनर्निर्माण करून समाजातील समरसता अन् संस्कृती जपली.
▪️महर्षी दयानंद सरस्वती यांची या वर्षी २०० वी जयंती आहे. त्यांनी पराधीन मानसिकतेतून मुक्त होत कालप्रवाहात नीतिमत्ता आणि सामाजिक चालीरीतींमध्ये आलेल्या विकृती दूर करून समाजाला आपल्या मूळच्या शाश्वत मूल्यांवर दृढ उभे करण्याचा प्रचंड उद्यम केला.
▪️भगवान बिरसा मुंडा यांच्या तेजस्वी जीवनयज्ञामुळेच आपल्या जनजातीय बांधवांच्या स्वाभिमान, विकास आणि राष्ट्रीय जीवनातील योगदानाचा सुदृढ आधार प्राप्त झाला आहे.
▪️ परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याची दृढताच मांगल्य आणि सज्जनतेच्या विजयासाठी शक्तीचा आधार बनते.
भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून साऱ्या जगात प्रतिष्ठाप्राप्त झाल्याने आपल्या परंपरेत आणि भावनेत अंतर्भूत असलेल्या कल्पनांचा अनेक क्षेत्रांत आदर वाढला आहे.
आज जग भारताची विश्वबंधुत्वाची भावना, पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी, योग इत्यादींचा नि:संकोच स्वीकार करीत आहे. समाजात विशेषत: तरुण पिढीमध्ये ‘स्व’ बोधाची भावना वाढत आहे.
▪️देशाची युवाशक्ती, मातृशक्ती, उद्योजक, शेतकरी, मजूर, सैनिक, प्रशासन आणि सरकार असे सर्वच घटक निष्ठेने कार्यरत राहतील, असा माझा विश्वास आहे.
आपल्या सर्वांच्या निर्धाराची परीक्षा पाहण्यासाठी काही बुद्धीभेद करणारी कारस्थाने आपल्यासमोर आहेत जी आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे.
देशभरात चहुदिशांना अस्थिरता आणि अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. असत्य किंवा अर्धसत्य याच्या आधारे भारताची प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
▪️बांगलादेशात हिंसक घटनांवरून असंघटित आणि दुर्बल राहणे म्हणजे दुष्टांच्या अत्याचारांना आमंत्रण देणे, हा धडा जगभरातील हिंदू समाजानेही घेतला पाहिजे.
समाजात असलेले मांगल्य आणि संस्कार नष्टभ्रष्ट करण्याचे, विविधतेचे फुटीरतावादात रूपांतर करण्याचे, समस्याग्रस्त समाजगटांमध्ये व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याचे आणि असंतोषाचे अराजकतेत रूपांतर करण्याचे प्रयत्न वाढले आहेत.
▪️आपले राष्ट्रीय जीवन सांस्कृतिक एकात्मता आणि श्रेष्ठ सभ्यतेच्या भक्कम पायावर उभे आहे. त्याला हानी पोहोचविण्याचे किंवा नष्ट करण्याचे प्रयत्न थांबवणे आवश्यक असून त्यासाठी जागरूक समाजालाच प्रयत्न करावे लागतील.
‘▪️डीप स्टेट’, ‘वोकिज़म’, ‘कल्चरल मार्क्सिस्ट’ असे शब्द सध्या चर्चेत आहेत. किंबहुना हे सर्वच सांस्कृतिक परंपरांचे घोषित शत्रू आहेत.
▪️ आपल्या स्वतःच्या घरात, कुटुंबात आणि समाजात जाहिराती आणि विकृत दृक-श्राव्य सामग्रीवर कायदेशीर नियंत्रणाची नितांत गरज आहे.
▪️स्त्रियांकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन “मातृत्व परदारेषु” ही आपली सांस्कृतिक देणगी आहे, कुटुंब, समाज आणि प्रसारमाध्यमांद्वारे अशी सांस्कृतिक मूल्ये रुजवण्याची व्यवस्था पुन्हा जागृत करायला हवी.
▪️देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्येही अचानक वाढ होत आहे. असे भडकावण्याचे प्रयत्न होतात किंवा नियोजनबद्ध पद्धतीने केले जातात. आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ‘अराजकतेचे व्याकरण’ ( ‘Grammar of Anarchy’ ) असे म्हटले आहे.
▪️गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकांवरील दगडफेकीच्या घटना आणि त्यानंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती हे ‘अराजकतेचे व्याकरणा’चे उदाहरण आहे.
▪️सर्वांनी मिळून हा देश एकसंध, सुखी, शांत, समृद्ध आणि सशक्त बनवणे ही प्रत्येकाची इच्छा आणि कर्तव्य आहे. यामध्ये हिंदू समाजाची जबाबदारी अधिक आहे.
▪️जेव्हा समाज स्वतः जागृत होतो, स्वतःच्या प्रयत्नाने आपले भाग्य लिहितो; तेव्हा महापुरुष, संघटन, संस्था, प्रशासन, शासन इत्यादी सर्व सहाय्यकारी होतात.
▪️विकासाच्या नावाखाली विनाशाकडे नेणाऱ्या विकासाच्या अपूर्ण मार्गावर आंधळेपणाने अनुसरण केल्याचे परिणाम आपण भोगत आहोत.
▪️मंदिरे, जलकुंभ, स्मशानभूमी इत्यादी सार्वजनिक वापराच्या आणि श्रद्धेच्या ठिकाणी समाजातील सर्व घटकांच्या सहभागासाठी अनुकूल वातावरण असणे आवश्यक आहे.
आपल्यातील दुर्बल जाती किंवा वर्गाच्या कल्याणासाठी आपण सर्व मिळून काय करू शकतो? असे विचार व कृती नित्य घडत राहिल्यास समाज सुदृढ होईल आणि समरसतेचे वातावरणही निर्माण होईल.
▪️उपभोगतावाद आणि जडवादाच्या अपूर्ण वैचारिक आधारावर चाललेला मानवाचा तथाकथित विकासप्रवास हा जवळपास मानवासह संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचा प्रवास बनला आहे.
▪️सर्वांनी मिळून हा देश एकसंध, सुखी, शांत, समृद्ध आणि सशक्त बनवणे ही प्रत्येकाची इच्छा आणि कर्तव्य आहे. यामध्ये हिंदू समाजाची जबाबदारी अधिक आहे.
▪️भारतात आज सर्वत्र मूल्यांचा ऱ्हास आणि भेदभाव करणाऱ्या घटकांच्या समाज तोडण्याच्या खेळी दिसत आहेत. जात, भाषा, प्रदेश इत्यादी छोट्या वैशिष्ट्यांच्या आधारे सामान्य समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
▪️आपण सर्व विविध जाती आणि वर्ग मिळून देशाच्या हितासाठी, आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण समाजाच्या हितासाठी, काय करू शकतो? त्याची योजना बनवून ती परिणामांपर्यंत घेऊन जावी. आपल्यातील दुर्बल जाती किंवा वर्गाच्या कल्याणासाठी आपण सर्व मिळून काय करू शकतो? असे विचार व कृती नित्य घडत राहिल्यास समाज सुदृढ होईल आणि समरसतेचे वातावरणही निर्माण होईल.
▪️आपल्या भारताच्या परंपरेतून मिळालेल्या संपूर्ण, सर्वांगीण आणि एकात्म दृष्टीच्याआधारे आपण आपला विकास मार्ग बनवायला हवा होता, परंतु आपण तसे केले नाही. त्यामुळेच पर्यावरणाची बिघडलेली स्थिती ही जागतिक समस्या निर्माण झाली आहे.
▪️सोशल मिडीयाचा वापर समाजाला जोडण्यासाठी, सुसंस्कृत बनवण्यासाठी केला पाहिजे
▪️वाईट संस्कृती पसरवण्यासाठी नाही याची काळजी सर्व सज्जनांनी घ्यायला हवी.
▪️घरातील वडीलधाऱ्यांची वागणूक, घरातील वातावरण आणि घरातील जिव्हाळ्याचे संवाद तसेच शिक्षण व्यवस्था व समाजातील वातावरण ही संस्कार देणारी व्यवस्था पुनर्स्थापित करावी लागेल, ती समर्थ, सक्षम करावी लागेल.
▪️ आपल्या राज्यघटनेतील संविधानाची प्रस्तावना, मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांची कर्तव्ये आणि नागरिकांचे हक्क यांची माहिती सर्वत्र पोहोचली पाहिजे, त्यातून समाजाचे प्रबोधन होत रहायला हवे.
▪️जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा आपण एकमेकांबद्दलच्या आपल्या वागण्यात काही कर्तव्ये आणि शिस्त विकसित करतो. कायदा आणि राज्यघटना ही देखील एक सामाजिक शिस्त आहे.