राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर आज यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात आज संध्याकाळी ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
सिद्दीकी यांच्यावर 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यातली एक गोळी त्यांच्या छातीत लागली होती.गोळीबाराच्या या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही.
बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पंधरा दिवासांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. दरम्यान बिष्णोई गँग या हल्ल्यामागे असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.