Nilesh Narayan Rane : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तारखा जाहीर झाल्यानंतर नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहेत. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत निलेश राणे (Nilesh Narayan Rane ) हाती धनुष्यबाण घेणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा सुरू आहेत. अशामध्ये भाजपने काल आपली
पाहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काल (रविवारी) भाजपने आपली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट आज आपली पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहेत.
भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून, काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतरच निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता येत्या 23 ऑक्टोबरला निलेश राणे हाती घेणार धनुष्यबाण घेणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही निलेश राणेंचे शिवसेने स्वागत आहे असे म्हंटले होते.
राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. अशातच सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आणि जोरदार तयारी सुरु केली आहे. खासकरून महारष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.