Yogendra Yadav : अकोल्यातील एका कार्यक्रमात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. त्यानंतर योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांना आपले भाषण थांबवावे लागले आहे.
अकोल्यात आज योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत’ या चर्चेवर विचार सभा सुरू होती. याच विचार सभेत योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या विचार सभेत गोंधळ घातला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू असताना मधेच माईक बंद करण्यात आला, त्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला, यावेळी तेथील वातावरण चिंताजनक बनले होते. अशास्थितीत संयोजकांनी योगेंद्र यादव यांना सुरक्षा दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी स्टेजवरून ‘जवाब दो, जवाब दो’ असे नारे देत, स्टेजवर जात माईक, खुर्च्या आणि सामान खाली फेकून दिले.
अकोल्यातल्या आज ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत’ या चर्चेवर ही विचारसभा आयोजित करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र डेमोक्रेटीक फोरम आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने या विचार सभेच आयोजन केले करण्यात आले होते. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगेंद्र यादव होते. ज्यांची ओळख भारत जोडो अभियानाचे संयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अशी आहे.
यावेळी योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात संविधानाच्या दृष्टिकोनातून काय चर्चा झाल्या, जवाब दो.. जवाब दो… असे नारे देण्यात आले. तसेच या ठिकाणी सामानाची फेकाफेकही करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत योगेंद्र यादव यांचा येथील कायर्क्रम मधेच थांबवावा लागला. मात्र, वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून कशामुळे हा गोंधळ घालण्यात आला, यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. पण, संविधानाच्या अनुषंगाने काय चर्चा केल्या, काय विचारमंथन केले, असा जाब वंचितकडून यावेळी विचारला जात आहे.