BJP Candidate List : महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशीही महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. शेवटच्या दिवशीही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. याचदरम्यान, भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे.
भाजपने आपल्या चौथ्या यादीत दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये मीरा भाईंदर आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.
BJP announces names of 2 more candidates for #MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/adGnbGzNSJ
— ANI (@ANI) October 29, 2024
भाजपकडून पहिल्या यादीत सर्वाधिक 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर तिसऱ्या यादीत 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आज भाजपने चौथ्या यादीत दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आतापर्यंत भाजपने १४८ उमेदवार जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. राज्यात एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. विधानसभेसाठी राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.