Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या कामाला गती आली असून राज्यात महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्ष राज्यात 14 जागांवर निवडणूक लढवत आहे. राज्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी पक्षाने ही घोषणा केली आहे. एआयएमआयएम पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पक्षाच्या अधिकृत हँडलवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
कोणाला कुठून दिले तिकीट?
सोशल मीडिया पोस्टनुसार, पक्षाने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून सय्यद इम्तियाज जलील, औरंगाबाद मध्य मतदारसंघातून नासिर सिद्दीकी, धुळे मतदारसंघातून फारूक शाह अनवर, मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती इस्माईल कासमी यांना उमेदवारी दिली आहे. भिवडी पश्चिम मतदारसंघातून वारिस पठाण, भायखळा मतदारसंघातून फैयाज अहमद खान, मुंब्रा कळवा मतदारसंघातून सैफ पठाण, वर्सोवा मतदारसंघातून रईस लश्करिया, सोलापूर मतदारसंघातून फारुक शाब्दी, मिरज [SC] जागेवरून महेश कांबळे, मूर्तिजापूर [SC] मतदारसंघातून सम्राट सुरवाडे. नांदेड दक्षिण मतदारसंघातून सय्यद मोईन, कुर्ला मतदारसंघातून बबिता कानडे आणि कारंजा मानोरा मतदारसंघातून मोहम्मद युसूफ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.एआयएमआयएमने महाराष्ट्र निवडणुकीत बहुतांश मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले असले तरी महाविकास आघाडीने फार कमी मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते युसूफ अब्राहानी यांनी तर MVA च्या मित्रपक्ष शिवसेना UBT वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी एमव्हीएला मतदान केले, परंतु युतीने या निवडणुकीत मुस्लिमांना तिकीट दिलेले नाही.
The Final List Of #AIMIM Candidates Contesting In The Upcoming #MaharashtraAssembly #Elections2024.#VoteForKite 🪁 #MaharashtraElection2024 pic.twitter.com/wCOLwQPyNu
— Akbaruddin Owaisi (@AkbarOwaisi_MIM) October 29, 2024
‘या’ तारखेला होणार मतदान
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.