Canada News : कॅनडात (Canada) पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात एक आहे. खलिस्तानी समर्थकांनी हिंदू सभा मंदिरात (Hindu Temples) आलेल्या लोकांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हिंदूंवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या हातात खलिस्तानी झेंडे होते. त्यांनी मंदिरात आलेल्या भाविकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.
दरम्यान, कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी या घटनेवर एक निवेदन सादर केले आहे. भारतीय उच्चायुक्ताने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आज टोरंटोजवळील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिराच्या संयोगाने आयोजित कॉन्सुलेट कॅम्पच्या बाहेर हिंदूंविरोधी घडलेली घटना पहिली आहे. “कॅनडातील सध्याची सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, कॅनेडियन अधिकाऱ्यांना या कार्यक्रमांसाठी अधिक सुरक्षा ठेवली पाहिजे.’
https://twitter.com/HCI_Ottawa/status/1853268151108010113
कॅनडात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लाठ्या-काठ्या घेऊन काही लोक मंदिराबाहेर भाविकांवर हल्ला करताना दिसत आहेत. जमाव खलिस्तान समर्थक गटांचे झेंडे घेऊन दिसत आहे. हिंदू कॅनेडियन फाऊंडेशन या ना-नफा कम्युनिटीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली की हल्ले झालेल्यांमध्ये महिला आणि मुले देखील आहेत.
कॅनडा सरकारकडून आले वक्तव्य
चंद्र आर्य, फेडरल खासदार आणि ट्रूडोच्या लिबरल पक्षाचे सदस्य, यांनी या घटनेसाठी खलिस्तानी अतिरेकींना जबाबदार धरले आहे. यावेळी त्यांनी खलिस्तानी हिंसक आणि निर्लज्ज बनले आहेत असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
आर्य पुढे बोलताना म्हणाले, ‘मला वाटते की या अहवालांमध्ये काही सत्य आहे की कॅनडाच्या राजकीय व्यवस्थेव्यतिरिक्त, खलिस्तानींनी आमच्या कायदा अंमलबजावणी संस्थांमध्येही घुसखोरी केली आहे.’ कॅनडाच्या खासदाराने पुढे चिंता व्यक्त करत म्हंटले आहे की, ‘खलिस्तानी अतिरेकी कॅनडाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याचा फायदा घेत आहेत.’ कॅनडात असा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही हिंदू मंदिरे तसेच हिंदूंना लक्ष करण्यात आले आहे.