IND vs NZ : काल भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला आहे. बऱ्याच दिवसांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच एखाद्या संघाने टीम इंडियाला क्लीन स्वीप केले आहे.
या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 25 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाच्या या पराभवामूळे त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाकडून नंबर एकच मुकुट हिसकावून घेतला गेला आहे. या मालिकेत भारतीय संघ सलग तीन सामने हरला आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
New Zealand wrap up a remarkable Test series with a 3-0 whitewash over India following a thrilling win in Mumbai 👏 #WTC25 | 📝 #INDvNZ: https://t.co/XMfjP9Wm9s pic.twitter.com/vV9OwFnObv
— ICC (@ICC) November 3, 2024
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाची आता पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया 62.82 च्या पीसीटी पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर होती. परंतु आता 58.33 च्या पीसीटी पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आली आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ 62.30 पीसीटी गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
या मालिकेनंतर न्यूझीलंड संघाला खूप फायदा झाला आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी त्यांचा संघ पाचव्या स्थानावर होता. जिथे त्यांचा पीसीटी स्कोअर ५० होता, पण या सामन्यातील विजयामुळे त्यांच स्कोर ५४.५५ झाला आणि संघ आता चौथ्या स्थानावर आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ आता पाचव्या स्थानावर आहे.
🚨 WTC POINTS TABLE…!!! 🚨 pic.twitter.com/rc7oGYBPkz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2024
कसा झाला सामना?
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जिथे त्याने पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या. यानंतर टीम इंडियाने 263 धावा केल्या आणि 28 धावांची आघाडी घेतली. यानंतर किवी संघ दुसऱ्या डावात 174 धावांत ऑलआऊट झाला आणि टीम इंडियाला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा टीम इंडिया पाठलाग करू शकली नाही आणि 121 धावांवर ऑलआऊट झाली आहे.