Israel–Hamas war : हमासविरुद्ध सुरु असलेल्या कारवाईत इस्राईली सैनिकांना (Israel–Hamas war) आणखी एक मोठे यश आले आहे. इस्राईली सैन्याला गाझामध्ये केलेल्या कारवाईत हमासच्या राजकीय ब्युरोच्या शेवटच्या उर्वरित सदस्यांपैकी एकाला मारण्यात यश आले आहे. शुक्रवारी दक्षिण गाझा पट्टीत झालेल्या हवाई हल्ल्यात हमासचा कमांडर इज अल-दीन कसाब ( izz-al-din-kassab) मारला गेला आहे.
कसाब हा हमासच्या राजकीय ब्युरोच्या शेवटच्या उर्वरित सदस्यांपैकी एक होता. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गाझामधील हमास आणि इतर दहशतवादी गटांमधील संबंध निर्माण करण्यात तो भूमिका बजावत होता.
कसाब कारमधून जात असताना दक्षिण गाझा येथील खान युनिस परिसरात त्याला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात कसाबचा जवळचा सहकारी अयमान आयेशही मारला गेला आहे. इस्राईलच्या लष्कराने हवाई हल्ल्याचे फुटेजही शेअर केले आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये एक कार येताना दिसत आहे. दरम्यान, इस्राईली विमानाने त्या कारला लक्ष्य केले आणि त्यानंतर स्फोट झाला ज्यामध्ये कसाब मारला गेला आहे.
כלי טיס של חה״א, בהכוונה מודיעינית מדוייקת של אגף המודיעין, פד״ם ושב״כ תקף וחיסל מוקדם יותר היום במרחב ח׳אן יונס את המחבל, עז אלדין כסאב, חבר הלשכה המדינית של ארגון הטרור חמאס, ששימש כאחראי תיק היחסים הלאומיים בארגון, אשר אמון על הקשר והתיאום בין חמאס ליתר ארגוני הטרור ברצועה>> pic.twitter.com/QD3guhAbKY
— צבא ההגנה לישראל (@idfonline) November 1, 2024
IDF ने सादर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, “कसाब त्याच्या भूमिकेमुळे हमाससाठी खूप महत्वाचा होता. कसाब गाझा पट्टीतील इतर दशदवादी गटांशी संपर्कात होता. तसेच इस्राईलवर दहशतवादी हल्ले करण्याच्या सूचना देण्याचा अधिकार देखील त्याच्याकडे होता.
आयडीएफने शुक्रवारी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया पेजवर इज्ज अल-दिन कसाबच्या फोटोसह हल्ल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच पेजवर लिहिण्यात आले आहे की, इस्राईलच्या हवाई हल्ल्यात कसाब मारला गेला आहे. तो हमासच्या एक प्रमुख सदस्यांपैकी एक होता.’